पनवेल महानगरपालिका


महाराष्ट्र विवाह मंडळाचे विनियम आणि विवाह नोंदणी अधिनियम १९९८ अन्वये विवाह नोंदणी करीता आवश्यक यादी.

 1. विवाहाच्या वेळी वराचे वय २१ वर्ष व वधुचे वय १८ वर्ष पूर्ण असावे. तसेच सर्व कागदपत्र फाईलमध्ये देणे.
 2. विवित नमुन्यात अर्ज (विज्ञप्ती फॉर्म ) मराठी व इंग्रजी दोन्ही ही भाषेत भरुन घ्यावा.
 3. वधू / वर यापैकी कोणीही एक पनवेल शहर महानगरपालिका हद्दीतील कायम रहिवासी असावा.
 4. विज्ञप्ती फार्मवर रक्कम रु.१००/- चे कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे.
 5. विवित नमूना अर्जावर (विज्ञप्ती फार्मवर) पुरोहिताचे नाव, पत्ता व स्वाक्षरी असावी. तसेच वर वधू व तीन साक्षीदार यांच्या सह्या घेणे आवश्यक आहे. साक्षीदार शक्यतो वर वधुचे नातेवाईक असावेत.
 6. वर-वधू यांच्या जन्माचा दाखला / शाळासोडल्याचा दाखला याची प्रमाणित (ॲटेस्टेड) प्रत सादर करावी.
 7. आंतरजातीय विवाहबाबत धर्मातरांबाबतचा दाखला किंवा १०० रु. चे स्टॅम्प वर ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.
 8. वर-वधू व तीन साक्षीदार यांचे प्रत्येक १ फोटो विज्ञप्ती फॉर्मवर लावणे आवश्यक आहे.
 9. विवाह महाराष्ट्र राज्यात संपन्न झालेला असावा. एक वर्षाचा पुढे असेल तर १०० रु चे स्टॅम्प पेपर वर ॲफिडेव्हिट करणे.प्रमाणपत्र देणेचे वेळी वर , वधू व ३ साक्षीदार समक्ष हजर असणे आवश्यक आहे.
 10. घटस्पोट असेल तर (डीकरी व जेजमेंट लावणे) तसेच वर वधू यांचे वैयक्तीक ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.
 11. विधुर / विधवा असेल तर (मृत्यु झालेला व्यक्तीचा दाखला जोडणे) तसेच वर-वधू यांचे वैयक्तीक ॲफिडेव्हिट करणे आवश्यक आहे.